Monday, July 26, 2010

मागे वळून पहाताना..

आज वयाची ३५ वर्षे पुर्ण झाली.. अजूनही मोठे झाल्यासारखे वाटत नाही.. मन अजूनही आयुष्यात स्थिरावल्यासारखे वाटत नाही.. अजून वाटते काहीतरी मिस होतंय.. माझंच आयुष्य जगतोय असे वाटत नाही.. प्रत्येकवेळी नवीन विचार, नवीन आशा, नवी स्वप्ने.. आणि पुन्हा नव्याने स्वप्नभंग..

शाळेत असताना वाढदिवसाची वेगळीच गंमत होती.. केक कापून वगैरे कधी वाढदिवस साजरा व्हायचा नाही.. आई ओवाळायची.. काहीतरी गोड.. मग संध्याकाळी मित्रांना बोलवायचे.. मेनू जवळपास सेमच असायचा.. भडंग आणि जिलेबी.. कधीतरी इकडेतिकडे होत असेल..

पण बंधूसाठी [सुहास] मात्र माझा वाढदिवस जिव्हाळ्याचा विषय असायचा.. त्याच एकूनच माझ्यावर खूप प्रेम.. तेवढ्याच अपेक्षापण.. [मी त्या पूर्ण करू शकलो नाही ही गोष्ट अलाहीदा..] पण मी कॉलेजला असताना वाढदिवसाच्या वेळी कुंडलला जायचो त्यावेळी तो न चुकता मला ड्रेस घ्यायचा.. हे त्याचे नेहमीचे ठरलेले.. मग परत येताना पैसे द्यायचा.. मी परत येताना खूप भावनाविवश व्हायचो.. या सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करायची.. मोठे व्हायचे.. यांना सुख द्यायचे.. असे विचार एसटीत बसलो की करत र्‍हायचो..

आज मागे वळून पहाताना वाटते.. आता प्राधान्यक्रम खूप बदलले आहेत.. दर महिन्याची तोंडमिळवणी हीच एक प्राथमिक गरज बनली आहे.. आणि माझ्याविषयीच्या घरच्यांच्या स्वप्नांना माझ्या मुलात बघतोय.. अर्थात असे असले तरी खोलवर उरात अजूनही आशा जिवंत आहे..

मागे वळून बघताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे मी कमालीचा बदललो.. मी जसा होतो आणि जसा आहे यात खूपच अंतर आहे.. आणि याबद्दल मात्र मला नितांत अभिमान आहे.. आणि अजूनही ती बदलाची प्रक्रिया चालूच आहे.. नित्यनवे चांगले विचार आत्मसात करायचे, अंगवळणी पाडायचे.. आणि जसे आपण अंघोळ करुन आरशासमोर आपले स्वच्छ रूप पहातो तसे स्वत:ला पहायचे.. ही एक प्रकारची स्वयंप्रेरणाच असते..

यश हे आभासी असते असे मला वाटते.. म्हणजे क्षितीजासारखे.. यदाकदाचित क्षितीजावर पोहोचलो तरी काही क्षणांत समोर दुसरे क्षितीज दिसू लागते..

एक गोष्ट नक्की आहे.. पूर्वी मी जेव्हा वाटचालीचा आढावा घ्यायचो तेव्हा केवळ निराशच व्हायचो.. काय नाही तेच दिसायचे.. पण आता मात्र काय कमी आहे याबरोबरच काय काय आहे हेही दिसते.. हेही नसे थोडके!!

अन आजच्या दिवशी मी आशा करतो की असा दिवस येईल की त्यादिवशी मला "काय काय आहे" एवढेच दिसेल..

थ्री चिअर्स....
काल अमीरखानची मुलाखत.. नाही, सुनावणी म्हणू.. आप की अदालत मध्ये बघितली.. त्याचे विचार, काम करण्याची पद्धत, त्याची भावनाशीलता सगळं पाहून वाटतं, मी त्याच्यासारखाच आहे.. फरक इतकाच की तो त्याच्या जॉनरमध्ये काम करतोय.. आणि मी नुसताच तसा विचार करतोय.. खरंय.. गेले कित्यैक दिवस मी आवडीच्या क्षेत्रात जाऊन काम करण्याचा विचार करतोय.. पण.. पुन्हा पण.. पाऊल उचलत नाही.. अभिनय, फोटोग्राफी आणि अलीकडे जरा जवळ्चे वाटणारे "समुपदेशन" चे क्षेत्र मला जवळचे वाटतात.. पण कळत नाही काय करायचे..

Saturday, July 24, 2010

आज गुरुपोर्णिमा॥ मला गुरूची गरज आहे.. पण माझी अशी धारणा आहे की गुरू शोधून सापडणार नाही। विश्वाचे नियोजन काटेकोर असते असे मी मानतो.. योग्य वेळी, मिळणार असेल तर, गुरू मिळेलच.. मग आज पूजा करतानाच गुरुदेव द्त्तांकडे त्यांनीच माझे गुरुपद घ्यावे अशी प्रार्थना केली..

आजची सकाळची पुरवणी "कौटुंबिक विसंवाद" या विषयांवर आहे॥ आमच्या त्रिकोणी कुटुंबात पण काही वेगळी परिस्थिती नाही, पण मी माझे प्रयत्न कधी कमी पडू देत नाही, आणि निराश होत नाही.. मला दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय झाला आहे, तेव्हा त्याचे नियंत्रण आता मी माझ्या हाती घेतले आहे..

आज खूप महिन्यांयी ब्लॉगवर लिहायला घेतलेय॥ मला माहीत नाही की नित्यनेमाने मी लिहीन की नाही॥ हे असेच आहे॥ नियमितता एकूणच स्वभावात नाही, त्याचाच परिपाक म्हणजे सध्याची परिस्थिती! माझ्या अजेंड्यावर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी असतात। जसे व्यायाम.. एकदा चालु केला की मग २-३, कधी ४ महिने मी सलग, न चुकता व्यायाम करीत रहातो.. पण मग काहीतरी घडतं आणि व्यायाम थांबतो.. पुन्हा चालु करणं होत नाही.. मग काही दिवसांनी पुन्हा सूर्यनमस्कार चालू करायचे.. मग ते बंद .. मग योगासने.. त्याचही असंच.. असंच ब्लॉगचपण...

पण तरीही मी थकत नाही.. तात्पुरता निराश होतो.. किती नुकसान झाले याचा अंदाज घेतो आणि काही दिवसांनी पुन्हा नव्या गोष्टीला सुरुवात करतो.. सध्या माझ्या अजेंड्यावरती आहे.. सूर्योपासना.. कशी? तर.. तीन प्रकारे.. १. सूर्यनमस्कार. २. गायत्री मंत्राचा जप. ३. अग्निहोत्र. आणि याला पूरक गोष्ट म्हणजे योगासने.. विशेषत: भस्त्रिका प्राणायाम..

अतिशय अस्थिर मनामुळे आणि ऊर्जेच्या खूप प्रमाणात होणार्‍या विकेंद्रीकरणामुळे [म्हणजे कधी हे बरे वाटणे, तर कधी ते, कुठल्याच गोष्टीवर न स्थिरावणे] सातत्याने अपयश येते हे मला कळते, पण... पण खूप मोठा आहे॥

असो॥ पण तरीही काही दिवसतरी मी ब्लॉग लिहीन अशी आशा करतो..

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरुवे नम:

Tuesday, December 16, 2008

योग्या गेला !!

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील एक काळा दिवस म्हणजे गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २००८.. रात्रीचे जेवण घेत होतो.. खरंतरं दुपारपासूनच अस्वस्थता होती.. संध्याकाळी ती जराशी वाढलीच होती.. पण वाटलं होतं कदाचित सकाळी व्यायाम न केल्याने आणि उपवास असल्यानेही असेल .. सुनिताबरोबर किरकोळ वादही झाला त्यावरुन.. ती म्हणाली, "आता कुणा मित्राचा फोन आला तर जाशील की नाही?" मी म्हटलं, "नाही जाणार, आज मूड नाही म्हणून सांगीन." मोबाईल वर FM सुरु होते.. अचानक फोन वाजला.. हरीचा होता .. पण मोबईलचे हेडसेट काढून फोन घेइपर्यंत फोन बंद झाला होता.. हरीचा फोन क्वचित यायचा, म्हणजे नाहीतच जमा.. त्यामुळे फोन कशासाठी असेल याचा तर्कवितर्क सुरु झाला.. विचार केला करु नंतर फोन.. थोड्या वेळानी त्याचाच फोन परत आला.. फोन घेतला.. म्हटलं "बोला, हरीभाऊ.."
हरीचा आवाज वेगळाच होता.. कातर आवाज म्हणू .. आणि त्याच पहिलं वाक्य, "विकास, योग्या गेला की रे.." माझ्या मनाने, कानाने हे वाक्य स्वीकारलेच नाही.. मी पुन्हा विचारले.. "काय झालं?".. त्याने सांगितले, "अरे आपला योगेश गेला की रे.." पुन्हा मनाचा नकार, मी विचारले, "काय झालं काय?" हरी म्हणाला, "अक्सिडेंट झाला रे त्यात योगेश गेला" मी म्हटलं "काय सांगतोयेस काय हरी.." मला म्हणायाचे होते तु योग्याबद्दल असं कसं म्हणू शकतोस.. तुझी खात्री आहे का? पुन्हा त्याचे तेच.. पुढचे सगळे प्रश्न मी विचारले ते गोंधळातच.. कुठे, कसा, कधी वगैरे..
तो म्हणाला, तु निघतोस ना। मी म्हणालो "होय, लगेच." हरी म्हणाला मी जाऊन येतो तिकडे॥ फोन बंद केला.. पण काही केल्या विश्वास बसत नव्हता.. काय करावे सुचत नव्हतं.. हात कापायला लागले.. मग आठवला पम्या, प्रमोद कुलकर्णी, योगेशचा चुलतभाऊ.. त्याला फोन लावला.. त्याचा आवाज उत्साही वाटला.. मी म्हणालो, कुठे आहेस?, तो म्हणाला, "पुण्यात".. मी म्हणालो, "अरे योगेशचे काय?"

"अरे त्याचा अस्किडेंट झालाय, आणि बहुतेक तो जागेवरच संपलाय."काय आणि कसं लिहू काय अवस्था झाली होती.. डोके धरूनच कॉटवर बसलो.. खूप खूप जोराने ओरडावे असे वाटत होते.. बातमी दोन ठिकानाहून कन्फर्म झाल्यामुळे खोट्या आशेला काहीही वाव नव्ह्ता.. मन मानायला तयार नव्हते..
कसली नियती ही? त्याला क्षणभराचाही अवधी दिला नव्हता.. ज्या क्षणी स्ट्रोक बसला त्याच किंवा पुढच्या क्षणाला त्याने देह सोडला होता..
मोहमाया योग्याला नव्हतीच कधी.. ज्याची होती त्याचा पुरेपूर उपभोग घेतला त्याने.. तेच कशाला.. सगळं आयुष्यचं तो रसरसून जगला.. मला वाटत पु. लं. जसे मस्तीत, धुंदीत जगले, योग्या अगदी तसाच जगला.. पठ्ठ्या जाइल तिथे मैफील जमवायचा.. आणि त्या प्रत्येक मैफीलीचा तो अनभिषिक्त सम्राट तो असायचा.. अफाट जन्मजात बुध्दीमत्ता, पचंड आकलनशक्ती, एकपाठी, उत्तम बोलणे असे की एकणार्‍याने चित्तवृती आणि देहाचा कान करून एकावे.. आणि त्याची म्हत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची विनोदबुद्धी.. सगलंच कसं अफलातून.. कलंदर, अवलिया काहीही म्हणा.. कशाचीही अतिशयोक्ती होणार नाही..
मी मुलखाचा सिरीयस माणूस.. पण योग्या भेटल्यापासून काही दिवसातच मी त्याच्यासमोर सिरीयस व्हायचे सोडून दिले.. नाहीतर हमखास टिंगळटवाळी व्हायची..
अनेकानेक घटना, गोष्टी आठवताहेत.. आता काय नुसत्या आठवणीच..
जशी माझी स्थिती आहे, तशीच अनेकांची आहे, यामधे हरी प्रामुख्याने येतो.. मी तर म्हनेन माझ्यापेक्षा त्याचे दु:ख जास्त आहे.. त्यांनी खूप आयुष्य एकत्र घालवले.. खूप एन्जॉय केला.. सुख-दुखं बघितली.. एकत्र काम केले.. त्यांच्या मैत्रीची वीण खूपच घट्ट होती, म्हणूनच तर जाण्यापूर्वी काही दिवस तो हरीला येऊन भेटून गेला.. गप्पा मारून, फोटो काढून, वहिनींजवळ हक्काने पोहे मागून.. काय आणि काय..
आणि मी दुर्दैवी.. गेली कित्येक दिवस त्याची आठ्वण होत असूनदेखील, जाऊया जाऊया करत जायचे राहून गेले.. फोन करायचे तर योग्य वेळेसाठी राहून गेले... म्हणजे माझं काम सकाळी, त्याचं दुपारनंतर रात्रीपर्यंत..
माझ्या आयुष्यात फार कमी मित्र आहेत.. योग्या त्यांपैकी एक.. तो असणं खूप काही होतं माझ्यासाठी.. बाहेरचा विध्वंस दिसू शकतो.. आतल्याच काय..?
आता काही लिहिवत नाही ..

Monday, December 1, 2008

एक महत्वाचा लेख.. धनंजय दिवाली अंक २००५ - गांधीवध आणि मी .. प्रा. मधुकर तोरडमल..

त्यावेळी मी सांताक्रुजला माझ्या काकांच्याकडे शिक्षणासाठी रहात असे। शुक्रवार, ता. ३० जानेवारी १९४८ या दिवशी शाळा सुटल्यानंतर आम्ही बंगल्यासमोरच्या अंगणात क्रिकेट खेळत होतो. माझी मावसबहिण शशिकला रेडिओ ऐकत हॉलमध्ये बसलेली होती. संध्याकाळचा साडेपाचचा सुमार होता. अचानक शशिकला ओरडत व्हरांड्यात आली. "गांधींना मारलं, गांधींना मारलं!" आम्ही धावत रेडिओभोवती जमा झालो. बातमी कानावर पडू लागली - "रोजच्या परिपाठाप्रमाणे संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी बापू आभा आणि मनूच्या खांद्यावर हात ठेऊन प्रार्थनास्थळाकडे जात होते. प्रार्थनेसाठी हजारभर स्त्री-पुरुष जमा झालेले होते. त्यांपैकी एक बुशशर्ट आणि पॅंट घातलेला माणूस बापूंच्या पुढे आला आणि वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करू लागला. मनूने त्याला बाजूला करण्याच प्रयत्न केला. पण त्या दणकट माणसाने डाव्या हाताने मनूला बाजूला ढकलले आणि उजव्या हाताने पॅंटीच्या खिशातली पिस्तूल काढून लागोपाठ तीन गोळ्या बापूंच्यावर झाडल्या. "हे राम" असे उद्गारून बापू खाली कोसळले, त्यावेळी ५ वाजून १७ मिनिटे झालेली होती."

आम्ही सर्व १४ ते १५ अशा वयोगटातले शाळकरी विद्यार्थी होतो। त्या अपरिपक्व वयोगटाला शोभतील अशीच आमची मते होती. माझा मावसभाऊ बाळ ससे उद्गारला, "बरं झालं म्हातार्‍याला उडवला. आमरण उपास करण्याच्या धमक्या देऊन नेहरू-पटेलांना ब्लॅकमेल करीत होता!"

"मुस्लीमांचा फार पुळका त्याला। त्यांच्यापैकीच कुणीतरी मारलं शेवटी. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो डंख मारल्याशिवाय राहील का?" दुसर्‍याने अक्कल पाजळली.
"पण आता त्यांची खैर नाही हं, कत्लेआम!"
"ते पण गप्प बसणारे नाहीत. पुन्हा सगळा देश पेटणार. रक्ताचे पाट वाहणार!"
"आपल्या मुंबईत तर कहर होईल।"आम्ही शाळकरी मुलं तोंडाला येयील ते बोलत होतो. आमच्या तोंडून जणू देशातल्या प्रत्येकाच्या मनातली भीतीच बोलत होती. पण या भीतीचे निवारण करणारी बातमीही लवकरच प्रसारीत करण्यात आली. बापूंच्यावर गोळ्या झाडून त्यांचा प्राण घेणारा कुणी मुस्लीम नव्हता, तर हिंदूच होता. तो हिंदूही कुणी निर्वासित सिंधी-पंजाबी असा परप्रांतीय नव्हता तर आमच्या महाराष्ट्रातला, महाराष्ट्रातल्या पुण्याचा, पुण्यातल्या ब्राह्मणाचा, ब्राह्मणातल्या हिंदूमहासभावाल्यांचा होता.
आता कत्तल, जाळपोळ, लुटालूट सुरू झाली ती आमच्याच घरात. कुणा गोडसेला गादीत गुंडाळून जाळण्यात आले. कुणा देशपांड्यांचे घरदार लुटण्यात आले. नगरला आमच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बागड्यांचा मोठा वाडा भस्मसात करण्यात आला. कोल्हापूला भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ जाळून टाकण्यात आला. बोलपटांच्या खाणीचे रूपांतर कोळश्याच्या खाणीत झाले. या सर्व अत्याचारांना कारणीभूत झालेल्या मारेकर्‍याचे नाव होते नथुराम गोडसे! त्याला जागच्या जागीच अटक करण्यात आली. पण हे एकट्याचे कृत्य नाही. यामागे अनेकांचे हात असावेत असा सरकारचा संशय होता. कारण मंगळवार २० जानेवरी १९४८ रोजी म्हणजे केवळ दहाच दिवस आधी संध्याकाळच्या प्रार्थेनेच्या वेळीच गांधीजींच्यापासून केवळ सत्तर फूट अंतरावर एक गावठी बॉंब फोडण्यात आलेला होता. वीस वर्षे वयाच्या मदन्लाल पहावा नावाच्या पंजाबी निर्वासिताने हा स्फोट घडविला असावा असा पोलिसांचा संशया होता. त्याला अटकही करण्यात आलेली होती, आणि आता तर बापूंचा खूनच करण्यात आलेला होता।
अटकसत्र सुरू झाले. नथुरामचा धाकटा भाऊ गोपाळ याला अटक झाली आणि सगळ्यांत नवल म्हणजे स्वातंत्रवीर सावरकरांनाही अटक झाली. नगरचे आपटे आणि करकरे यांनी स्वत:ला अटक करवून घेतली.

चीड, मनस्ताप, अस्वस्थता ... खूप काही ..

मुम्बई सुटली, पण आपण सगळे अडकलोय - एका कठीण प्रश्नात - कधी सुटणार हां दहशतवादाचा विळखा - आज अनेक भारतीय ज्या विषयावर बोलत आसतील, चर्चा करत असतील, प्रसार माध्यामांचा ज्यावर खल चालू असेल असा एकमेव प्रश्न ॥ माझी यावरची मते पुर्विही तशीच होती, आजही तशीच आहेत ॥ खरतर दहशतवाद्यांची संख्या पहाता आणि आपली संरक्षनाची ताकद पहाता, यांना नेस्तनाबूत करने फार अवघड नाही, कमी पडते ती राजकीय इच्छाशक्ति!! जी कधीच नव्हती राज्यकर्त्यांकडे !!
मुस्लिम हे या देशाला लागलेले सुरुन्गाच आहेत। मी केवळ आताची गोष्ट बोलत नाही तर अगदी पहिल्या मुस्लिम स्वारीपासून! ते थेट फाळ्णीपर्यंत आणि त्यानंतर स्वातंत्र्यापश्चात.. मुस्लिम हा नेहमी आमच्या देशात "नाजूक" विषय केला गेलाय, त्यामुळेच बांगलादेशातून घुसखोरी केली काय किंवा पाकिस्तानातून नातेवाईकांना भेटायला म्हणून आलेले, पण परत न गेलेले काय [इथे रहाण्यार्यांचा विषयच नको ..] पण त्याबद्द्ल कार्यवाही करायला किंवा बोलायलाही आमचे सत्ताधारी तयार नसतात.. केवळ मुस्लीम आहेत म्हणून..??

महाराष्ट्रातले माझ्या माहितीचे एक गांव आहे॥ मालेगांव.. जे सध्या न्युज मधे आहे.. त्याचा गेल्या ५०-६० वर्षाचा इतिहास काढुन पाहीला.. तर भारताच्या भवितव्याचा अंदाज बांधता येयील ..

गांधीवाद सोडून द्यायला हवा, तरच भारताला भारत म्हनून भवितव्य आहे॥

वन्दे मातरम!!

Thursday, October 23, 2008

राज मुक्त झाले !

काल राज मुक्त झाले ! आणि कितेकानी मुक्त श्वास घेतले असतील - यामधे पोलिस, सत्ताधारी, जनता, आणि त्यांचे चाहते देखील! मी देखील

खरतर मनसे च्या स्थापनेपासुनाच राज यांची खरी ओळख होऊ लागली आहे, अन्यथा त्यांचे व्यक्तिमत्व बाल ठाकरे यांच्या प्रभावाखाली झाकून गेले होते। पण तरीही राजनी जो झंझावत निर्माण केलाय तो काबिले तारीफ आहे। त्यांच्या कार्याबद्दल आता प्रेम वाटू लागले आहे। त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेछा