आज गुरुपोर्णिमा॥ मला गुरूची गरज आहे.. पण माझी अशी धारणा आहे की गुरू शोधून सापडणार नाही। विश्वाचे नियोजन काटेकोर असते असे मी मानतो.. योग्य वेळी, मिळणार असेल तर, गुरू मिळेलच.. मग आज पूजा करतानाच गुरुदेव द्त्तांकडे त्यांनीच माझे गुरुपद घ्यावे अशी प्रार्थना केली..
आजची सकाळची पुरवणी "कौटुंबिक विसंवाद" या विषयांवर आहे॥ आमच्या त्रिकोणी कुटुंबात पण काही वेगळी परिस्थिती नाही, पण मी माझे प्रयत्न कधी कमी पडू देत नाही, आणि निराश होत नाही.. मला दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय झाला आहे, तेव्हा त्याचे नियंत्रण आता मी माझ्या हाती घेतले आहे..
आज खूप महिन्यांयी ब्लॉगवर लिहायला घेतलेय॥ मला माहीत नाही की नित्यनेमाने मी लिहीन की नाही॥ हे असेच आहे॥ नियमितता एकूणच स्वभावात नाही, त्याचाच परिपाक म्हणजे सध्याची परिस्थिती! माझ्या अजेंड्यावर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी असतात। जसे व्यायाम.. एकदा चालु केला की मग २-३, कधी ४ महिने मी सलग, न चुकता व्यायाम करीत रहातो.. पण मग काहीतरी घडतं आणि व्यायाम थांबतो.. पुन्हा चालु करणं होत नाही.. मग काही दिवसांनी पुन्हा सूर्यनमस्कार चालू करायचे.. मग ते बंद .. मग योगासने.. त्याचही असंच.. असंच ब्लॉगचपण...
पण तरीही मी थकत नाही.. तात्पुरता निराश होतो.. किती नुकसान झाले याचा अंदाज घेतो आणि काही दिवसांनी पुन्हा नव्या गोष्टीला सुरुवात करतो.. सध्या माझ्या अजेंड्यावरती आहे.. सूर्योपासना.. कशी? तर.. तीन प्रकारे.. १. सूर्यनमस्कार. २. गायत्री मंत्राचा जप. ३. अग्निहोत्र. आणि याला पूरक गोष्ट म्हणजे योगासने.. विशेषत: भस्त्रिका प्राणायाम..
अतिशय अस्थिर मनामुळे आणि ऊर्जेच्या खूप प्रमाणात होणार्या विकेंद्रीकरणामुळे [म्हणजे कधी हे बरे वाटणे, तर कधी ते, कुठल्याच गोष्टीवर न स्थिरावणे] सातत्याने अपयश येते हे मला कळते, पण... पण खूप मोठा आहे॥
असो॥ पण तरीही काही दिवसतरी मी ब्लॉग लिहीन अशी आशा करतो..
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरुवे नम:
Saturday, July 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment